shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ मध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न .

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ मध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न .
इंदापूर : इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच प्रभाग क्रमांक १ सूजन नागरी संघाचे समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्याचा लाभ प्रभागातील २०० नागरिकांनी घेतला या निमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास शेळके यांच्यासह अंकुश बळगानोरे यांनी लसीकरण केले.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक अनिकेत वाघ, मा नगरसेवक प्रशांत शिताप, सुधीर मखरे, महादेवराव लोखंडे, विकास खिलारे ,मुकुंद साळुंके, तुकाराम कांबळे , श्रीकांत मखरे,  मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक  अमोल उन्हाळे उपस्थित होते.
close