शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
राहुरी पोलिस अधिकाऱ्याच्या निष्क्रीयेते मुळे चोऱ्यांचे सत्र सुरूच; पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या बदलीची मागणी..!!
राहुरी : सध्या राहुरी तालुक्यात सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात रोज रात्री कुठे ना कुठे तरी चोरी होत आहे. पुन्हा एकदा खमक्या अधिकार्याची मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून जोर धरू लागली आहे.
रविवार दि.१२ डिसेंबर रोजी राहुरी खुर्द येथिल आनंद झुंबरलाल देसरडा यांच्या सुधीर ट्रेडर्स या किरणा दुकानाचा पत्र उचकटून चोरट्याने दुकानातून रोख रक्कम, माल व २ मोबाइल चोरून नेले आहेत. देसरडा यांनी पोलिसांना याची तक्रार दिलेली आहे. सुधीर ट्रेडर्स या दुकानांतील CC TV फुटेज मध्ये चोरटा स्पष्टपणे चोरी करतांना दिसत आहेत. राहुरी खुर्द मध्ये सातत्याने छोट्या मोठ्या चोऱ्यांमुळे व्यापारी व नागरिक हैराण झालेले आहेत. रविवारी दुपारी देसरडा यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. चोरट्याने रविवारी रात्री ८.१५ मी. छतावरील पत्रे उचकटून चोरी केलेली आहे. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. CC TV फुटेज मध्ये चोरी करणारा चोर स्पष्ट पणे दिसत आहेत. चोर हा राहुरी खुर्द परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.
राहुरी शहरात देखील नुकतेच एक दारूचे दुकानात चोरी दरम्यान चोरांचा चेहरा स्पष्ट दिसून आलेला आहे. परंतु पोलिस अधिकाऱ्यांकडून अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमते मुळेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी यावेळी घटना स्थळी भेट देत पाहणी केली असता या प्रसंगी ते म्हणाले की वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी हैराण झालेले आहे. वेळीच चोरांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन छेडले जाणार आहे. राहुरी तालुक्याला सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासलेली आहे. पोलिस म.निरीक्षक बी.जी.शेखर व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे पुन्हा पो.नि.मुकुंद देशमुख अथवा पो.नि.नंदकुमार दुधाळ यांच्या सारख्या सक्षम पोलिस अधिकारी नेमणुकीची मागणी केली जाणार आहे. लवकरच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची देखील भेट घेवून राहुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची निष्क्रियता लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या समोर मांडण्यात येणार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

