शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.
प्रतिनीधी:- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (Special security unit) गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. यावेळी या गाडीत उदय सामंत एकटेच होते.गाडीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या या अपघातात उदय सामंत यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

