shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विरोधकांना धास्ती वाटल्यानेच ईडीची चौकशी,चौकशीत काही एक निष्पन्न होणार नसून विकास कामांचा झपाटा सुरूच ठेवणार - राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ 


विरोधकांना धास्ती वाटल्यानेच ईडीची चौकशी,चौकशीत काही एक निष्पन्न होणार नसून विकास कामांचा झपाटा सुरूच ठेवणार - राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे..!!

राहुरी : तालुक्यांतील प्रश्‍नांची सोडवणूक करीत असताना राज्यात नेतृत्वाची संधी मिळाली. विरोधकांना धास्ती वाटल्यानेच ईडीची चौकशी लावली. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पावर यांचे मार्गदर्शन घेऊन राजकारणात आहे. ईडी संस्थेच्या चौकशीत काही एक निष्पन्न होणार नसून विकास कामांचा झपाटा सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपरे यांनी केले.

         राहुरी येथे केशर मंगल कार्यालय येथे परिवार संवाद कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव हे होते. याप्रसंगी राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, शरद पवार यांची दुरदृष्टी राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी बहुमुल्य ठरली आहे. पुणे परिसरातील हिंजवडी परिसर अविकसित असताना त्या क्षेत्रामध्ये आयटी हब निर्माण होईल हे सुतोवाच पवार यांनी केले होते. अखेर ते शब्द खरे ठरले. देशामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या उद्योगाला व शेती क्षेत्राला काय लाभदायी ठरेल याचे प्रखर ज्ञान आमचे नेते पवारांकडे आहे. त्यांचा मार्गदर्शन आम्हाला लाभल्याने राज्यामध्ये आदर्शवत कामे करीत आहे.


पहिल्यांदाच आमदारकी व त्यानंतर मंत्रीपदासाठी पवार यांचे पाठबळ महत्वाचे ठरले. राज्यात चांगले काम करीत असल्याचे पाहून विरोधी भाजपाने केंद्र शासनाच्या सत्तेचा गैरफायदा घेऊन ईडी संस्थेकडून नोटिस काढली. परंतु माझ्या चांगल्या कामाचा लाभ मला जनतेकडून मिळाला आहे. ईडी संस्थेकडून चौकशी होत असताना जनतेकडून सोशल मीडियामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. जनता पाठीशी असल्याचे पाहून खूप समाधानी वाटले. राहुरी मतदार संघातील जनतेने भरभरून प्रेम दिले.
माझ्या विकास कामांमध्ये कोणताही अडसर येणार नाही. राहुरी शहरामध्ये मागिल आठवड्यातच 7 कोटी रूपये रस्ते व जलतरण तलावासाठी मंजूर केल्याची घोषणा केली होती. जॉगिंग ट्रॅकसाठी 2 कोटी रूपये मंजूर करून शहराच्या विकास कामांना भरीव निधी देणार आहे. आगामी सहा महिन्यात संपूर्ण शहरामध्ये अंतर्गत गटारीसाठी भरीव निधी देणार आहे. बसस्थानकाचा प्रश्‍न मार्गी लावला होता. परंतु कोरोना कालखंडाने परिवहन विभागाला तोटा झाला. उपलब्ध निधीचा वापर कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी करावा लागला. परंतु लकवरच राहुरी बसस्थानकाचे काम बीओटी तत्वावर पूर्ण केले जाईल. राहुरी शहरातील ग्रामिण रुग्णालयाच्या जागेचा वाद सुरू होता. न्यायालयापेक्षा तो वाद सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश आले आहे. लवकरच राहुरी ग्रामिण रुग्णालयाच्या बांधकामाला जुन्या जागेतच प्रारंभ होईल. मतदार संघातील प्रश्‍न सोडविले जात असताना राहुरी तालुक्यातील 32 गावांचा प्रश्‍नही सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या कुटुंबातील भाग आहे. कार्यकर्त्यांनी दिलेले बळ मला लढण्याची प्रेरणा देत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्र सरडे यांनी सांगितले की, 81 वर्षाच्या प्रवासात शरद पवार यांची ताकद 18 वर्षीय तरूणाप्रमाणे आहे. प्रखर ज्ञान व विकास कामांची हातोटी पाहता पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये कुटुंबात काम केल्याची प्रचिती आहे. राष्ट्रवादी पक्षाला बळकटी मिळाली असून राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या विकास कामांचा धडाका पाहून विरोधकांनी भिती निर्माण झाली. त्यामुळेच ईडी संस्थेचा वापर करून राज्यमंत्री तनपुरे यांच्यावरील ईडीचा डाव विरोधकांच्या अंगलट येणार असल्याचे सरडे यांनी सांगितले.
            याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, युवक अध्यक्ष धीरज पानसंबळ, ज्ञानदेव बाचकर, ऋषिकेश माळवदे यांनी मनोगत व्यक्त केले.  पंचायत समिती सभापती बेबीताई सोडनर, उपसभापती प्रदिप पवार, सुरेश निमसे, रविंद्र आढाव, सुनिल अडसूरे, प्रभाकर गाडे, बाळासाहेब लटके,डॉ.राजेंद्र बानकर,भैयासाहेब तारडे, बाळासाहेब गाडे, वसंत गाडे, भास्कर गाडे, महेश उदावंत,संतोष आघाव, बाळासाहेब खुळे, सचिन भिगारदे, गोरक्षनाथ गाडे, बाबासाहेब भोईटे, विलास तनपुरे, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, गुलाब बर्डे,राजेंद्र बोरकर,अतुल तनपुरे, अ‍ॅड. राहुल शेटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close