shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शशिकांत पारख यांचे कार्य शिर्डीकरांसाठी अभिमानास्पद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१.

नगराध्यक्ष गोंदकर यांचे गौरवोद्गार, शिर्डीकरांतर्फे नागरी सत्कार...

शिर्डी - श्री साईबाबांच्या पुण्यनगरीतील भूमिपूत्र असलेल्या शशिकांत पारख यांनी नाशिकमध्ये रुग्णसेवेसोबतच शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य अवघ्या शिर्डीकरांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांची ही वाटचाल उत्तरोत्तर अशीच उत्तुंग राहिल, अशा शब्दांत शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पारख यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
           शिर्डी शहरात गुरुवारी रात्री सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिकमधील जैन ओसवाल बोर्डिंगच्या निवडणुकीत पारख यांचा संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी विजयी झाला. यानिमित्त या बैठकीत पारख यांचा नगराध्यक्ष गोंदकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, माजी नगरसेवक अभय शेळके,शिवसेना नेते कमलाकर कोते यांच्यासह ज्ञानेश्वर गोंदकर,प्रतापराव जगताप,विजयराव जगताप,राजेंद्र कोते,अशोक गोंदकर, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते मंगेश त्रिभुवन,मधुकर कोते ,शब्बीर सय्यद,गणेश जाधव,गोपीनाथ गोंदकर,नितीन शेळके सुधीर शिंदे,.अविनाश शेजवळ, सचिन शिंदे, गजानन शेरवेकर, दीपक वारुळे,जगन्नाथ गोंदकर,सुजित गोंदकर,रवींद्र गोंदकर,राहुल गोंदकर,सुनील परदेशी,खंडू गोर्डे,समीर शेख,विनायक रत्नपारखी,प्रशांत कोते,पंडित गुडे,अनिल पवार,गंगाधर कोते,दिनकर कोते,ताराचंद शेजवळ,महेश गोंदकर,गणेश कोते,उमेश शेजवळ,शिमोन जगताप,नाना काटकर,किसन शेटे मामा,गिरीश सोनेजी,तानाजी गोंदकर,राजू गोंदकर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

      नगराध्यक्ष गोंदकर पुढे म्हणाले की, पारख यांची कामातील सचोटी, सातत्य आणि पारदर्शी कारभारामुळेच मतदारांनी त्यांना श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या प्रगतीसाठी पुन्हा संधी दिली. विशेष म्हणजे पारख हे नामको चॅरिटेबल ट्रस्टवर सेक्रेटरीपदीदेखील कार्यरत आहेत. त्या संस्थेचे रुग्णालय एखाद्या बड्या हॉस्पिटलला लाजवेल असे आहे. मी स्वतः एका रुग्णाला त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आलेला अनुभव खरोखरच सुखद होता. दर्जेदार सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा आणि आता कार्डियॅक लॅबची होणारी उपलब्धता, हे सर्वकाही पारख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे शक्य झाले. त्यांचा हा प्रवास यापुढेही असाच उल्लेखनीय ठरो, अशा सदिच्छाही गोंदकर यांनी दिल्या.
माजी नगरसेवक अभय शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. पारख यांची वाटचाल अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गोंदकर यांनी केले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
-----------

साईबाबांच्या सेवाकार्याचा आदर्श

     सत्कारानंतर बोलताना शशिकांत पारख म्हणाले की, शिर्डीमधून २० वर्षांपूर्वी शिक्षणासाठी नाशिकच्या वाटेवर निघालो. मात्र, मनात साईबाबांच्या सेवाकार्याचा आदर्श हा नेहमीच कायम राहीला. त्याच प्रेरणेतून शक्य तेवढे समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या वसतिगृहात मी शिकलो, त्या संस्थेच्या प्रगतीसाठी १० वर्ष संधी मिळणं हा माझ्या पाठीशी असलेला साईबाबांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. कधीकाळी जुन्या अवस्थेत असलेल्या श्री जैन ओसवाल बोर्डिंगला काळानुरुप बदललेल्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक स्वरुप प्राप्त करुन दिले. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत उभ्या राहिल्या आणि आता सुसज्ज अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आणखी एका इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. रुग्णसेवेच्या वाटेवर असलेल्या नामको हॉस्पिटलची देखील प्रगती अशीच दिमाखदार सुरू आहे. कॅन्सर हॉस्पिटलपाठोपाठ मल्टिस्पेशालिटी विभाग आणि आता थेट कार्डिअॅक लॅबपर्यंतचा हा प्रवास उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल. सेवाकार्य नाशिकमध्ये सुरू असले तरीही शिर्डीच्या मातीचे, जन्मभूमीशी असलेले बंध आजही कायम आहेत. नामको हॉस्पिटलशी संबंधित काहीही काम असेल तर माझ्या ९८८१०६७००७ या क्रमांकावर कधीही संपर्क साधा, असे आवाहनही पारख यांनी केले.

 ✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close