shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझी वसुंधरा अभियान मध्ये गोखळी गावाचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार -सरपंच व उपसरपंच. गोखळी येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.

माझी वसुंधरा अभियान मध्ये गोखळी गावाचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार -सरपंच व उपसरपंच.
  
 

गोखळी येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी ग्रामपंचायत अंतर्गत माजी वसुंधरा या अभियानाचा  दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गुरुकुल विद्या मंदिर येथे रांगोळी स्पर्धा, नाटक स्पर्धा व वृक्षारोपण करण्यात आले. गुरुकुल विद्या मंदिर येथे उपस्थित सोळाशे विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा अंतर्गत शपथ घेण्यात आली.
 तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी व फडतरे वस्ती या ठिकाणी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले. याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत गोखळी यांच्यावतीने वह्या पेन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तसेच गुरूकुल विद्यामंदिर यातील विद्यार्थ्यांच्या वतीने गावातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास विजयकुमार परीट गट विकास अधिकारी, सौ अलका बापू पोळ सरपंच, उपसरपंच सचिन तरंगे, गुरुकुल विद्या मंदिर संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ, ग्रामपंचायत सदस्य बापू पोळ, तुकाराम वाघमोडे, सौ. मनीषा महारनवर, राघू पारेकर, ग्रामसेवक गायकवाड मॅडम, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती फडतरे वस्ती चे अध्यक्ष औदुंबर बारवकर, उपाध्यक्ष दादा पारेकर ,गुरूकुल विद्यामंदिर चे मुख्याध्यापक हुलगे सर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, फडतरे जिल्हा परिषद शाळेचे मुलांनी सर इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानामध्ये गोखळी गावाचा प्रथम क्रमांक करण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार असल्याची सरपंच सौ अलका बापू पोळ व उपसरपंच सचिन तरंगे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक गायकवाड मॅडम यांच्यावतीने  सांगण्यात आले.
close