shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनाथ आश्रमातील अनाथ मुलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार ; जि.प.सदस्य शरद नवले..!

बेलापूर  (प्रतिनिधी ):-- श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची असुन या आश्रमातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जि. प. सदस्य शरद नवले यांनी दिली.              

महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मिळालेला बोनस गरीबांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना मिळालेल्या बोनसचे चार हजार रुपये तसेच तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी दिलेला मदतीनिधी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या वेळी बोलताना जि. प. सदस्य शरद  नवले म्हणाले की, या ठिकाणी आश्रमास पत्र्याचे शेड बांधुन देण्याची मागणी असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, तसेच येथील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु, या आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांचे वय अवघे १९ वर्ष असतानाही ते १४ अनाथ मुलाचा सांभाळ करत आहेत ते स्वतः अनाथ असुनही अनाथाचा ते नाथ बनले आहेत. असेही ते म्हणाले.

या वेळी कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या आश्रमात चौदा अनाथ मुले राहत असुन त्याचा दैनंदिन व शिक्षणाचा खर्च मोठा आहे या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे.  त्या करीता दानशुरांनी या आश्रमास मदत करावी असे आवाहन कृष्णानंद महाराजांनी केले आहे. या वेळी पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास चेतन जाधव, पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार, किशोर कदम, प्रकाश मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
close