शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
वांबोरी : राज्यात अग्रगण्य असणारी नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या वांबोरी शाखेत आज नागेबाबा विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन कडुभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
यामध्ये अहमदनगर शहरात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या खातेदारांना रोज दोन वेळा मोफत डबे पोहोच केले जातात तसेच तीनशे रुपये मध्ये दहा लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो याच बरोबर रक्त तपासणी शिबिर ,नेत्र तपासणी शिबिर तसेच आपल्या खातेदारांमध्ये वाचन संस्कृती जोपासावी यासाठी सत्तर रुपयात विविध पुस्तके दिली जातात याच बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात..
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर गणेश महाराज नवले, गोरक्षनाथ दुधाडे,आसाराम रहाणे,साहेबराव ठाणगे,शंकर शेवाळे,रायभान घुगरकर, अशोक तुपे,लक्ष्मण पळसकर,बाबासाहेब गांधले,सारंगधर पटारे,विश्वंभर माळवदे,यशवंत पवार, अभय बिबवे,शिवपाल जंगम, बाबासाहेब शिंदे यांच्यासह योगिता पटारे, देविदास कदम, मच्छिंद्र नळे ,गणेश तगवाले, मुकेश ससाने,बालाजी गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना योगिता पटारे यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रम व कार्याबद्दल माहिती दिली.
नागेबाबा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्र राज्यात सहा जिल्ह्यात 57 शाखा असून पंधराशे कोटींचा व्यवसाय आहे तसेच पाच लाख समाधानी खातेदार या संस्थेचे जोडले आहेत.
संस्थेच्या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेला जाणीव हा सामाजिक कार्याबद्दल तसेच झी 24 तास चा उडाण पुरस्कार मिळालेले आहेत
नागेबाबा मल्टीस्टेट च्या वांबोरी शाखेत विचारधन दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

