shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम - वस्ताद किरण गोसावी.वडापुरी येथे जय हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लब चा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम - वस्ताद किरण गोसावी.

वडापुरी येथे जय हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लब चा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे उद्गार जय हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लब चे वस्ताद किरण गोसावी यांनी क्लब च्या वर्धापन दिनी उपस्थित युवकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देताना (दि.११) रोजी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे जय हनुमान व्यायाम शाळा व फिटनेस क्लब चा दुसरा वर्धापन दिन दिनांक ११ डिसेंबर२०२१ रोजी क्लबचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद किरण गोसावी यांच्यासह व्यायाम शाळेतील सर्व युवकांच्या उपस्थित केक कापून साजरा करण्यात आला .यावेळी उपस्थित सर्वांनी आनंदमय वातावरणात आताषबाजी करून टाळ्यांच्या कडकडाटासह आनंद व्यक्त करून  केक कापून साजरा केला.

यावेळी वस्ताद किरण गोसावी यांनी उपस्थित युवकांना व्यायामा संदर्भात माहिती देताना म्हटले की,शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम” असे आपली वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळेतील पुस्तकात वाचले असेल आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते परंतु एवढे वाचून किंवा ऐकूनसुद्धा नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु आपल्या वडापुरी तील या व्यायाम शाळा मध्ये आणिक युवकांचा व्यायामासाठी कल वाढू लागला आहे. तरी या अध्यावत व्यायाम शाळेचा युवकांनी उपयोग करून आपले सदृढ आणि निरोगी शरीर ठेवण्याचा प्रयत्न करावा असे यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. या अद्ययावत जय हनुमान व्यायामशाळा व फिटनेस क्लबला आत्तापर्यंत अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच प्रेम राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
close