shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संपूर्ण देशाला आदर्शवत ठरणारा लोकआयुक्त कायदा महाराष्ट्र राज्य सरकारने करावा-अशोक सब्बन.

अहमदनगर :- संस्थापक अध्यक्ष  जेष्ठ समाजसेवक मा.अण्णा हजारे प्रणित- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या अहमदनगर जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा,तालुका व शहरांची नविन कार्यकारणीची बांधणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना राज्य सरचिटणीस अशोक सब्बन म्हणाले.                                                                                                                                                     
          ते पुढे म्हणाले,महाराष्ट्र राज्य हे देशा मध्ये कायमच आदर्शवत असे राज्य  राहिले आहे राज्याने केलेले अनेक कायदे हे देशाला पथदर्शी राहाले आहे.   भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या प्रयत्नाने राज्यात 73 व्या घटना दुरूस्तीची अंमलबजावणी, ग्रामसभेला व्यापक अधिकार,माहिती अधिकार कायदा,नागरिकांची सनद,सेवाहमी हमी कायदा,  दप्तर दिंरगाई,बदल्याच्या संदर्भाने कायदा,दारूबंदी संदर्भातील कायदे,लोकपाल अशा अनेक कायद्याची निर्मिती करण्यासाठी जनआंदोलाचाच सक्रिय सहभाग होता.या सर्व कायद्यामुळे शासन प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायीत्व व  लोकसहभाग वाढण्यास मोठी मदत झाली आहे.नागरीकांच्या तक्ररीवर  तसेच उच्चपदस्ताच्या  भ्रष्टाचारावर त्वरीत कारवाई होण्याचे दॄष्टीने सशक्त  लोकआयुक्त कायदा राज्यत निर्माण होणे आवश्यक आहे. जनआंदोलनाच्या वतीने सातत्याने सक्षम असा लोकआयुक्त कायदा व्हावा या साठी संघर्ष केला असून नव्याने पुर्नरबांधणी जनआंदोलनाची होत असतांना कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सशक्त जन लोकआयुक्त कायदा निर्मिती साठी संघर्षाची तयरी ठेवावी. असेअवाहन केले.      


               जिल्हा संघटक सुधिर भद्रे म्हणाले      गेल्या 7,8 वर्षा पासून संघटनेच्या कामकाजा मध्ये खंड पडून ही जिल्हातील निष्ठावंत कार्यकर्ते  जनआंदोलना बरोबरच आहेत हे आजच्या बैठकीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा वरून निदर्शनास येते.     डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे यांनी सुत्र संचलन केले तर  अशोक ढगे यांनी प्रस्तावना केली व  पोपटराव साठे यांनी  आभार मानले.  या सभेला एस. टी बसेस बंद असतांना,प्रवसाच्या साधनाची अपुरी उपलब्धता असतांनाही मोठा प्रतिसाद  देशाचया व समाजाच्याहितासाठी जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि पुन्ह एकदा व्यवस्था परिवर्तनाच्या संघर्षाची तयारी दर्शवली.                                   जिल्हा,शहर व तालुक्यातील कार्यकारणीवर काम करण्यास ईच्छुक असणार्‍या सर्वानी आपल्या परीसरातील  प्रमाणिक चारित्रसंपन्न कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याच्यादॄष्टीने प्रयत्न करावेत असे अवाहन केले.                                                        अशोक सब्बन मो.9422083206  
सुधिर भद्रे 9321440082*
close