पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ' ब ' वर्गातून भरला उमेदवारी अर्ज .
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बुधवार रोजी शक्तिप्रदर्शन करीत ब वर्गातून उमेदवारी अर्ज भरला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. पुणे जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक होत असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. २९ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वरती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गेल्या पंचवीस वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती .भरणे हे गेल्या अनेक वर्षांपासून 'ब ' वर्गातून निवडणूक लढवत असून त्यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. इंदापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.'ब ' वर्गासाठी पणन व कृषी संबंधित सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतात. जिल्ह्यामध्ये सुमारे ९० मतदार आहेत. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रवीण तुपे ,जयदीप काळभोर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,प्रशांत पाटील, उपस्थित होते. प्रवीण तुपे हे उमेदवारी अर्ज करिता सूचक म्हणून व जयदीप काळभोर अनुमोदक आहेत.

