shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असल्याने राहुरी तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१

"ग्रीनफील्ड प्रकल्प ग्रस्तांचे हुकूमशाही थांबवा, अन्नदाता वाचवा च्या टोप्या घालत बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी पर्यंत पावसात आणि थंडीतही सुरूच"

"बेमुदत उपोषणात राहुरी तालुक्यातील वांबोरी, खडांबे खु, खंडांबे बु, सडे, डिग्रस, राहुरी बु, राहुरी खु, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, चिंचविहीरे, वडनेर, तांभरे, तांदूळनेर, माळेवाडी- डूक्रेवाडी, सोनगाव, धानोरे, कनगर खु, कनगर बु या १९ गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश"

"सूत्रांच्या माहितीनुसार सुरत-नाशिक- नगर ग्रीनफील्ड हायवेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आज राहूरी तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांची भेट घेण्याकरिता ग्रीनफील्ड प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल दिवाण आणि प्रांताधिकारी साहेब देखिल येणार आहे."
राहुरी : सुरत-नाशिक- नगर ग्रीनफील्ड हायवेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आज राहूरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी हुकूमशाही थांबवा, अन्नदाता वाचवा च्या टोप्या घालत प्रकल्पाच्या हुकूमशाही पद्धतीवर रोष प्रकट केल्याने उपोषणाला चांगलीच धार आली आहे.
बेमुदत उपोषणात राहुरी तालुक्यातील वांबोरी, खडांबे खु, खंडांबे बु, सडे, डिग्रस, राहुरी बु, राहुरी खु, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, चिंचविहीरे, वडनेर, तांभरे, तांदूळनेर, माळेवाडी- डूक्रेवाडी, सोनगाव, धानोरे, कनगर खु, कनगर बु या १९ गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. सुरत हैद्राबाद ग्रीनफीड हायवेसाठी शेतकल्यांच्या जमिनींचे शासकीय भूसंपादन प्रक्रिया सुरू आहेे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या मागणीनुसार, शेतकन्यांच्या हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करू नये, तसेच बागायती जमिनी बाबत राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात.
राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायत क्षेत्र म्हणून केल्या आहेत. सदर चुकीची नोंदणी दुरुस्ती करण्यात यावी. जमिनीचा मोबदला जमिनीचे स्थानिक बाजार मूल्य विचारात घेऊन जाहीर करावा. नंतरच पुढील कारवाई करावी.जमिनीचा मोबदला हा जमिनीचे स्थानिक बाजार मूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, नंतरच पुढील कार्यवाही करावी. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर, घेतलेल्या हरकतीच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा न करता या उताऱ्याच्या इतर हक्कात केलेली सदर महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी. राहुरी शहरातील मोठा बागायत भाग यात जाणार आहे, त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मागील काही वर्षातील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे दर गृहीत न धरता सध्याच्या जमिनींच्या बाजारभावाच्या दराप्रमाणे मोबदला गृहीत धरावा. बागायती व शहरी जमिनी असल्याने बाजारमूल्य अधिक आहे, ज्यांचे मोठे क्षेत्र जाणार आहे त्यांच्याशी पूर्ण चर्चा करूनच निर्णय घ्यावा. सर्विस रोडबाबत शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी सर्विस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात.

बेमुदत उपोषणाला बाळासाहेब लटके, गंगाधर सांगळे, दीपक शेडगे, अशोक तोडमल, प्रसाद मैड, अण्णासाहेब तोडमल, नंदकुमार वराळे, संजय हरिश्चंद्रे , नानासाहेब हरिश्चंद्रे, रविंद्र हरिश्चंद्रे, अविनाश कल्हापूरे, देवीदास कल्हापूरे, मंगेश हरिश्चंद्रे, सुरेश धोंडे, गणेश पारे, प्रकाश हरिश्चंद्रे, राहुल कल्हापूरे, सोमनाथ जवरे, कृष्णा मैड, जमीर आतार, सागर धोंडे, बाबासाहेब शिंदे, प्रसाद तोडमल, शामराव शिंदे, लक्ष्मण अंत्रे, विनोद अंत्रे, दादासाहेब नालकर, रंगनाथ घाडगे, विजय निमसे, गणेश घाडगे, सुभाष डुकरे , संजय धोंडे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्प बाधित शेतकरी बसले आहेत.
        सदर मागण्यांची दखल शासनाने तात्काळ न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close