shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केली तूर पिकाच्या वांझ रोगग्रस्त प्लॉटची पाहणी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 


कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केली तूर पिकाच्या वांझ रोगग्रस्त प्लॉटची पाहणी..!!

अहमदनगर : सन 2021 च्या खरीप हंगामात माहे जून ते नोव्हेंबरपर्यंत सतत बदलणारे ढगाळ वातावरण, कमी अधिक तापमान, अवेळी पडणार्या पाऊसामुळे वाढलेली आर्द्रता या सर्व कारणामुळे एरिडोफाईड माईटचा झालेला प्रादुर्भाव व यामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव वाढून तूरीला कमी फुले व शेंगा लागलेल्या आहेत.

        सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालीहाळ बु., संख, पांडोझरी व गिरगाव येथील तुरीच्या पिकाला कमी प्रमाणात फुले व शेंगा लागलेल्या असल्याबाबतची तक्रार कृषी विद्यापीठाला प्राप्त झालेली होती. त्या अनुषंगाने वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय अमोलिक, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ आणि तूर रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी संबंधीत शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन रोगग्रस्त तुरीच्या प्लॅाटची पाहणी केली.

 

याप्रसंगी डॉ. चांगदेव वायळ यांनी तुरीवरील किडींच्या नियंत्रणाबाबत तर डॉ. विश्वास चव्हाण यांनी तुरीवरील रोगांच्या नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एस. एम. सातपुते, तालुका कृषी अधिकारी, जत, एस. के. थोरात, मंडळ कृषी अधिकारी, माडग्याळ, एल. ए. लांडगे, मंडळ कृषी अधिकारी, उमदी, बी. टी. नागणे, कृषी पर्यवेक्षक, श्रीमती. व्हि. के. राठोड, कृषी सहाय्यक तसेच शेतकरी उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close