शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१
अहमदनगर : जिल्ह्यात नुकताच माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या चिरंजीवांच्या शाही पध्दतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शानदार लग्न सोहळा संपन्न झाला, “चोराच्या मनात चांदण” तस या लग्नात मोठी गर्दी जमलेली होती.
याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वराडीकडाच्या एका मंडळीच्या गळ्यात तब्बल 98 हजार रुपय एवढी किंमत असलेली चमकत असणारी सोन्याची साखळी डाव साधून चोरली. या घटने प्रकरणी नगर भिंगार कॅम्प येथील पोलीस ठाण्यामध्ये अण्णा सोपान जगताप यांनी फिर्याद नोंदवली आहे.
असा काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून फौजफाटा तैनात केलेला असतानाही चोरट्यांनी बरोबर नेम साधत गेम केला, सुरक्षा रक्षकांना माहिती देण्यात आली परंतु गर्दीचा फायदा घेत चोरटे पसार झाले. एवढ्या मोठ्या शाही लग्न सोहळ्यात एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा टाईट असताना चोरी झालीच कशी..?, आणि चोर देखील लुबाडून लंपास झालेचं कसे याचीच नगर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे..!
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

