शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
जाहीर नोटीस दिल्याने पतसंस्थेच्या मॅनेजरला बेलापूरच्या सभासदाकडुन मारहाण..!!
बेलापुर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक या गावामध्ये असलेल्या कामधेनु पतसंस्थेमध्ये मधुकर सखाहारी शिंदे हे मॅनेजर म्हणून काम करतात. कामधेनु पतसंस्थेत बेलापूर खुर्द येथे राहणारे रविंद्र शंकर गाढे हे सभासद आहेत.
रविंद्र गाढे यांनी कामधेनू पतसंस्थेकडून कर्ज घेतले असून ते अद्याप पर्यंत फेडलेले नाही. त्यामुळे मॅनेजर शिंदे यांनी यासंदर्भात गाढे यांची स्थावर मालमत्ता जप्तीची नोटीस वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली.या जाहीर नोटीसचा राग आल्याने रवींद्र गाढे यांनी बेलापूर बुद्रुक येथील पतसंस्थेच्या कार्यालयात येऊन मॅनेजर शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
जाहीर नोटीस दिल्याने पतसंस्थेच्या मॅनेजरला बेलापूरच्या सभासदाकडुन मारहाण….
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून मॅनेजर शिंदे यांनी कोर्टात देखील या प्रकरणी फिर्याद दाखल केलेली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

