शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१.
डेक्कन ओडिसी रेल्वे शिर्डी मार्गे न्यावी – कमलाकर कोते..!!
शिर्डीच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून खासदार लोखंडे यांचेही प्रयत्न..
शिर्डी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर यावे यासाठी शासनाच्या वतीने जे प्रयत्न सुरु आहेत त्यात डेक्कन ओडिसी या शाही रेल्वेतून होणारे महाराष्ट्र दर्शन हे अतिशय महत्वाचे आहे. जानेवारी महिन्यापासून डेक्कन ओडिसी रेल्वे सुरु होणार आहे ही शाही गाडी शिर्डी मार्गे जावी अशी मागणी शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी केली आहे. श्री. कोते यांच्या मागणीची दखल घेऊन खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले आहे अशी माहिती कमलाकर कोते यांनी दिली आहे.
खासदार लोखंडे यांनी दिलेले निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणे, समुद्र किनारे, लेणी अशा काही गोष्टी डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून देशविदेशातील पर्यटकांना बघायला मिळतात. महाराष्ट्राला जी मोठी संत परंपरा लाभलेली आहे या परंपरेतील महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री साईबाबा. धर्मभेद, जातीभेद बाजूला सारून अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी साईबाबांनी आपले जीवन समर्पित केले होते. श्री साईबाबांसारख्या संतांचे महाराष्ट्राच्या आणि समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. जगभरातील पर्यटकांना अशा संत परंपरेची ओळख करून देण्याचे काम डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून होऊ शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी मनमाडहून अवघ्या ३० -४० मिनिटात शिर्डीला सहज येऊ शकते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

