shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाला रामनेनी फौंडेशन USA यांचा सेवा कार्याचा विशेष पुरस्कार जाहीर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१.

शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाला रामनेनी फौंडेशन USA यांचा सेवा कार्याचा विशेष पुरस्कार जाहीर..!!

शिर्डी : शिर्डीच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाला रामनेनी फौंडेशन USA यांचा सेवा कार्याचा विशेष पुरस्कार जाहीर..!!
हैद्राबाद येथे सदर पुरस्काराचे वितरण भारताचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या शुभहस्ते द्वारकामाई वृद्धश्रमाचे श्रीनिवासजी यांनी स्वीकारला...
1 लाख रोख रक्कम व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
 द्वारकामाई वृद्धश्रमाचे कार्य गेल्या 25 वर्षापासून सुरु आहे.
ज्यांना कोणीही नाही अशा निराधारांना मोफत सांभाळण्याचे काम श्रीनिवासजी आपल्या कुटुंबासह करत आहे.
2000 साली 3 वृद्धांपासून सुरु झालेला हा आश्रम आज तब्बल 150 वृद्धांना मोफत सांभाळत आहे...
तुम्ही कधीतरी या वृदाश्रमाला भेट द्या!! 
येथील वृद्धांच्या चेहऱ्यावरील हास्य येथील सर्व काही सांगून जाते...
श्रीनिवास भैयांना नक्की भेटा 
वृध्दाश्रमाची प्रेरणा कशी भेटली ? 
साईबाबांचा साक्षात्कार कसा झाला ?
जागा कशी विकत घेतली ?
बांधकाम कसे झाले ? 
जेवण कसे देतात ?
स्वच्छता कशी आहे ? 
रोजचे उपक्रम काय ?
वृद्ध का खुश आहेत ?
कौन कौन मदत करतात ?
असे अनेक प्रश्न आपणास पडतात 
श्रीनिवास भैयाचे उत्तर एकच असते.
ये वृद्धाश्रम में नही चला सकता....
       यह सब साईबाबा चलाते हे..!!!


असा ठाम विश्वास मनात ठेवून श्रीनिवासजी अनंत अडचणींचा सामना करत निरंतर सेवा कार्य करत आहे.
त्यांना सेवा क्षेत्रात विशेष पुरस्कार मिळाला त्यांचे खूप खूप अभिनंदन!!

150 निराधार वृद्धांना मोफत सांभाळणाऱ्या व प्रसिद्धीपासून कायम दूर राहणाऱ्या या अवलिया( श्रीनिवास भैया) सेवकास 
पद्मश्री पुरस्कारासाठी आपण सर्व मिळून भविष्यात प्रयत्न करूयात...

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close