shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील दीन-दलित,पीडित, शोषित लोकांचा राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ बनणार आवाज.राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली यांच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक मौजे गोखळी संपन्न.

इंदापूर तालुक्यातील दीन-दलित,पीडित, शोषित लोकांचा राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ बनणार आवाज.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली यांच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक मौजे गोखळी संपन्न.
फोटो : राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघातर्फे देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रशांत शिताप स्वीकारताना.

इंदापूर प्रतिनिधी: मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली यांच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक मौजे गोखळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे(दिनांक १९ नोव्हेंबर )रोजी बैठक पार पाडली. 
सदर कार्यक्रमात समाजातील राजकीय ,सामाजिक शैक्षणिक, कृषी ,आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संघाचे अध्यक्ष संदीप  लोंढे, इंदापूर तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष नाथा  तरंगे व गुरुकुल विद्या मंदिर गोखळी चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ यांच्या हस्ते देण्यात आला. 

या कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेची प्रस्तावना वाचून करण्यात आली आणि राज्यघटनेतील सर्व कलमांचा उपयोग समाजातील ज्या व्यक्तींवर अति अन्याय होतो त्यांना न्याय देण्यासाठी केला जाईल अशी शपथ या सदर कार्यक्रमात घेण्यात आली. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघ नवी दिल्ली या कार्यकारिणीतील महासचिव- मनोज भोसले, उपाध्यक्ष- लालासाहेब सपकाळ, उपाध्यक्ष- दिलीप शेठ भिसे, महिला उपाध्यक्ष -बकुळा शेंडे, सचिव- अंकुश सरगर, सहसचिव -राजेंद्र तरंगे, सल्लागार -महानवर गुरुजी, तसेच हनुमान चित्राव, विधी सल्लागार -सिंगारे वकील  बाळासाहेब चितळकर यांची उपस्थिती अवर्णनीय होती. तसेच गुरुकुल विद्या मंदिर गोखळी चे विद्यार्थी ,गोखळी गावातील ग्रामस्थ हे सुद्धा उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत हरणावळ सर यांनी केले तर आभारप्रदर्शन  बाळासाहेब चितळकर यानी मानले.
close