shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मध्ये एक जानेवारी रोजी होणार ओबीसींचे आंदोलन - पांडुरंग शिंदे.

इंदापूर मध्ये एक जानेवारी रोजी होणार ओबीसींचे आंदोलन -  पांडुरंग शिंदे. 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे १ जानेवारी २०२२ रोजी ओबीसींच्या वतीने सावतामाळी मंदिरापासून ते बाबा चौकापर्यंत भव्य मोर्चा काढून रस्ता रोको होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी चे इंदापूर तालुका ओबीसी मोर्चाचे  अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात शासकीय विश्रामगृह येथे (दि. २२ नोव्हेंबर) उपस्थित ओबीसी बांधवांना संबोधित करताना दिली.
यावेळी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत, भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे संपत जाधव, युवराज मस्के, संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, शब्बीर बेपारी, बहुजन मुक्ती पार्टी चेसंजय (डोनाल्ड )शिंदे, दत्तात्रय सपकाळ, आबासाहेब थोरात, कर्मयोगी कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे, पोपट पवार इत्यादी मान्यवर व ओबीसी बांधव उपस्थित होते.
यावेळी रमेश राऊत यांनी सांगितले की ,ओबीसी समाज एकत्र आला तर आपल्याला न्याय मिळणार आहे. आपण जर गप्प बसलो तर येणारी पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. त्यासाठी गट तट राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 
याप्रसंगी संजय (डोनाल्ड) शिंदे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, जर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे .संविधानानुसार संख्येनुसार आरक्षण दिले पाहिजे म्हणजेच ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांना वाटा पाहिजे तर या आरक्षणासाठी वेळ पडली तर निवडणूक बहिष्कार, जेलमध्ये जाऊ, संघर्षाशिवाय आरक्षण मिळणे अशक्य आहे.
close