shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली नगरपालिकेच्या सफाई कामगारांना किमान वेतन लागू ; देवळाली प्रवारा हेल्प टीम आणि भिम आर्मीच्या आंदोलनाला यश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ 

देवळाली प्रवारा हेल्प टीम आणि भिम आर्मीच्या आंदोलनाला यश....
किमान वेतनाचा फरक मिळणेसाठी हेल्प टीम आग्रही - दत्ता कडू पाटील..!!

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेत ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या ८० स्वच्छता कामगारांना किमान वेतन लागू करण्यासाठी देवळाली हेल्प टीम आणि भिम आर्मी ने केलेली मागणी मुख्याधिकारी आणि ठेकेदाराने आज मान्य केली. 
         या बद्दल माहिती देताना हेल्प टीमचे दत्ता कडू म्हणाले की, मुख्याधिकारी नगरपरिषद यांची भेट घेत सफाई कामगारांचे किमान वेतनाबाबत हेल्फ टीमच्यावतीने आज सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सवीस्तर निवेदन दिले. त्यावर सांगोपांग चर्चा झाली. त्यांनी कर्मचारी तीनचार तासच काम करतात. ठेकेदारांची ओरड आहे. सफाई कामगारांकडुन काम करुन घेणे त्याची जबाबदारी आहे. कामगारांना नियमांनुसार वेतन देणे त्याला बंधनकारक आहे. सकारात्मक निर्णय घेतो म्हणुन मुख्याधिकारी यांनी आम्हांस आश्वासीत केले. 
    
        मुख्याधिकारी यांनी आश्वासीत केल्याप्रमाणे संबंधित ठेकेदारांला बोलावुन सफाई कामगारांचे प्रतीनिधीसोबत सकाळी बैठक केली. त्यात जेवढे काम करतात तेवढे पैसे मी त्यांना देतो. मी पगार वाढवुन देणार नाही म्हणत ठेकेदार निघुन गेला. मग आंदोलन तीव्र करण्यात आले. आप्पासाहेब ढुस यांनी तो विषय लाईव्ह करत राज्यात नेला. मीहि कामगार आयुक्त यांना आमचे निवेदन न् कंपनीचे आडमुठे धोरण यावर संदेश पाठवत पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. दुपारनंतर दबाव वाढल्याने पुन्हा बैठक झाली त्यात ४ तासच काम करणा-या सफाई कामगारांना ८५०० रुपये दरमहा पगार देण्याचे लेखी ठेकेदार यांनी मुख्याधिकारी यांचेकडे व संघटनेच्या मुन्ना भाभी चावरे यांना दिले. जो आठ तास काम करेल त्यास १३४२८ इतके वेतन मिळेल.  
   
          आता प्रश्न आहे गेली ४ वर्ष त्यांना देण्यात आलेल्या कमी पगाराबाबत. ती अंत्यत गंभीर बाब आहे. मागावर्गीय मेहतर समाजाचे आर्थीक शोषण आहे एकप्रकारचे. तो कायद्याने मोठा गुन्हा आहे. हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तो फरक ४ तासाचे काम करणा-यांस १ लाख २० हजार व ८ तास काम करणा-यांस ३ लाख छप्पन हजार पाचशे चव्वेचाळीस. तो मिळाला पाहिजे यासाठी संघटना आक्रमक झाली आहे. फरक मागणार नाही अशी अट आता वेतन वाढवताना घालण्याची मागणी संघटनेने नाकारली आहे. चला गरिबांना न्याय मिळाला. देरसे सही... मुख्याधिकारी न् ठेकेदाराचे अभिनंदन. आता फरक देण्याची कृपा करा. तुमचा पेढे तुला करुन बाजारतळावर जाहिर सत्कार करु. हेल्फ टीमचे भुछत्र जरा बाळसे धरु लागले आहे. आमची कोल्हेकुई शासन दरबारी ऐकली जावु लागली आहे. देवळालीकरांनो तुम्हांला काय वाटते आम्ही करतो ते चुक कि बरोबर. पहा चिंतन करा. तसंच आपले खिसे तपासा तो कापला तर नाही ना. असे शेवटीं कडू पाटील म्हणाले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close