शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा संपन्न..!!
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा व चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नुजिविडू सीडसव कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत काटोळे साहेब , पी.डी.व्यवस्थापक राजीव बिराजदार साहेब, रविंद्र वाट साहेब, प्रेम बाभूळकेे साहेब , ज्ञानेश्वर उदागे साहेब, शुभम शेळके साहेब के.एस. अँग्रोचे प्रमोद मुसमाडे साहेब, तुषार मुसमाडे साहेब आदि उपस्थित होते. यावेळी नुजिविडू सीडसकंपनीचे आशा एन.सी.एस ९०-११ या कपाशी वाणाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. प्रसंगी व्यासपीठावर अण्णा आरंगळे, गोवर्धन मुसमाडे, डॉ.वारुळे, बबन शिंदे,गणेश कोतकर, अविनाश आरंगळे, बाबासाहेब कोतकर, श्री.सालबंदे, गोकुळ शिंदे, सुरेश वारुळे, अमोल संसारे, राहुल गावडे, प्रसाद शिंदे, अविनाश काळे, मनोज संसारे, सौ.आरंगळे, उज्ज्वला मुसमाडे, आदि. उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा लकी ड्रो काढण्यात येऊन भाग्यवान १० शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले. तर आण्णा आरंगळे सर यांना भव्य लकी ड्रोमध्ये टीव्हीबक्षीस प्रदान करण्यात आले. प्रसंगी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद मुसमाडे, तुषार मुसमाडे, शुभम शेळके आदींसह ब्राम्हणगाव भांड परिसरातील शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

