shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे-वांबोरी रस्त्यालगत दगडखाणीतून सुरूंग उडवले जातात मात्र महसूल अधिकारी व प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत...!


एक महिला किरकोळ जखमी व
 पत्र्याच्या शेडवर दगड पडल्यामुळे पत्रा तुटला..!

देहरे । प्रतिनिधी :- 
देहरे- वांबोरी रोडला देहरे- इस्लामपुर शिवेवर नगर मनमाड रोडचे काम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराकडुन दगडखाणीत शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी  न घेता धोकेदायक पध्दतीने दिवसाढवळ्या सुरुंग उडवुन आजुबाजुच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशी, त्यांच्या पशुधनास तसेच देहरे वांबोरी रोडवरुन प्रवास करणारे एमआयडीसी कामगार व इतर प्रवासी यांचे जनजीवन पुर्ण धोक्यात आलेले आहे. 

         तरी महसूल अधिकारी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र हप्ताखोरी चालू असल्यामुळे झोपेचे सोंग घेऊन काहिच घडत नाही असे दाखवतात.ही शोकांतिका आहे या परिसरात रस्त्यावरच असलेल्या दगडखाणीतून सुरूंग उडविण्यात आले. तेव्हा हा स्फोट इतका भयानक होता की,या स्फोटाची उंची अर्धा किमी पर्यंत होती.यामुळे खाणी शेजारी असलेले नागरिक व पशुधन बेदरलेल्या अवस्थेत दिसली. तसेच शेजारील एका घरा जवळील शेडवर त्या सुरुंग स्फोट झाल्यानंतर दगड पडुन शेडचा पुर्ण पत्रा तुटून दोन व्यक्ती बालंबाल बचावले. तसेच एका महिलेस एक दगड जोरात उडुन लागला व ती महिला जखमी झाली आहे.परंतु सुदैवाने प्राणहानी झाली नाही. 

              यासाठी सदर प्रशासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे व संबंधितांवर उचित कार्यवाही करावी.अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल.असा इशारा वांबोरी, इस्लामपूर व देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत आहे. जर यापुढील काळात या परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल.असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
close