सोनई । (मोहन शेगर):-
गेल्या काही दिवसापासुन अपघातात गंभीर जखमी नेवासा तालुक्यातील सोनई येथील झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य नितिन प्रभाकर दरंदले यांचे आज पुणे येथील खाजगी रूग्णालयात मृत्यृशी झुंज देताना निधन झाले. त्यांचे वय 48 वर्ष होते.त्यांच्या मागे आई, वडिल,भाऊ,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.
सोनई ग्रामपंचायतचे सदस्य म्हणुण काम करताना त्यांनी गावातील गोर गरीब जनतेच्या समस्या नेहमी सोडवल्या. यामुळे ते अल्पावधीतच सोनई परिसरात आपल्या सामाजिक सेवा व गोड स्वभावाने लोकप्रिय झाले होते.
नितीन दरंदले यांचा काही दिवसांपुर्वी सोनई राहुरी रोड येथे त्यांना एका अज्ञात लटकुने धडक दिली होती.त्यामध्ये त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. गेल्या चोवीस दिवसा पासुन ते अहमदनगर ,पुणे येथील हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार चालू होते.पण गुरुवारी दुपारी त्यांचे दुखदः निधन झाले.दरंदले यांच्या निधनाने सोनई व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावर भाविकांची नेहमीच वर्दळ असते. शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविक भक्तांच्या गाड्यामागे धावणारे लटकू ह्या सोनई ते शनिशिंगणापूर रस्त्यावर सुसाट धावतात आणि दिवसभरातून कित्येक अपघात देखील होतात. पोलिस प्रशासन काय करते? दरंदले यांच्या मृत्युला कोण जबाबदार आहे..? लटकुवर कारवाई का होत नाही.? अजून किती बळी घेणार आहे..? यावर पोलिस प्रशासन आता तरी कडक भुमिका घेणार का असे सवाल सोनई परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

