shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिली ते सातवी मुलांची शाळा सुरु ; ओसंडून वाहतोय मुलांचा उत्साह


राष्ट्रगीत प्रार्थना मुलांनी दोन वर्षांनी अनुभवली ; मुले ही शाळेचा आत्मा - अनुरिता झगडे

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २ /  असं म्हणतात ना लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून मुले रडायची.. पण आता शाळेची आठवण येते म्हणून मुले रडतात. खरंच मुलेही शाळेचा आत्मा आहे शाळा म्हटले की मुले आणि मुले म्हटले की शाळा.

 covid-१९ संसर्गाच्या दोन वर्षाच्या काळात शाळा व विद्यार्थी यांच्यावर खूप परिणाम झाला. शाळेपासून सक्तीने मुलांना वंचित राहायला सांगितले. वर्च्युअल वर्ग सुरू होते पण काही संकल्पना प्रयोग कृती उपक्रम हे प्रत्यक्ष शाळेतूनच मुलांना शिकवले जातात. 

खूप दिवसांनी इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांसाठी शासनाकडून घंटा वाजविण्यात आली आणि खरंच त्याला खूप चांगला म्हणजे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी जल्लोषात व उत्साहात स्वागत करण्यात आले. 

शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी चे सर्व वर्ग कलात्मक पद्धतीने सजावट करण्यात आले होते. जेथे परिपाठ घेण्यात येतो त्या ठिकाणी विद्यार्थी शारीरिक अंतर पाहतील अशा पद्धतीने मार्किंग करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारातच तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात येत होती. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला अजूनच भरते आले ते मिकी माऊस च्या स्वागताने छोटी मुले तर अगदी आनंदाने मिकी माऊस सोबत डान्स करत करत शालेय आवारात प्रवेश करीत होती.

 उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा सहकार्यातून आवश्यक असलेले संमतीपत्रे शाळेला सादर करून दर्शविलेल्या आदेशांचे पालन करत संमती चा हिरवा झेंडा जणू शाळेला दाखवून शाळेविषयी आत्मीयता दर्शविली. प्रत्येक वर्गातून 50 टक्क्यांहून अधिक उपस्थिती विद्यार्थ्यांची होती. प्रत्येक वर्गात सानी टायझर सुरक्षित अंतर मास तपासणी वगैरे व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट चे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्वागत म्हणून मास्क देण्यात आले. छोट्या मुलांचे कार्टून मास्क पाहून मुले अगदी आनंदून गेली होती. परिपाठ अंतर्गत राष्ट्रगीत प्रार्थना मुलांनी जवळजवळ दोन वर्षांनी अनुभवली. त्यानंतर  बालगीते लावण्यात आली. त्यावर शिक्षक विद्यार्थी यांनी अगदी ठेका धरत उत्साहात शालेय प्रवेशाचे स्वागत करत आलेल्या संसर्गाला न घाबरता पण काळजी घेऊन सादरीकरण केले. 

खरेच त्या वेळी वातावरणात मुलांच्या किलबिलाटाने शिक्षकही अगदी भारावून गेले होते. सर्व शिक्षकांकडून उपस्थित विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण ढोल-ताशांच्या गजरात करण्यात येत होती. या सर्व कार्यक्रमाचे काही पालक प्रवेशद्वारातूनच मोबाईल द्वारे कौतुकाने चित्रीकरण करत होते. शाळेच्या प्राचार्य राधिका जेऊरकर यांनी स्वागत व मार्गदर्शन केले. समन्वयक सौ. अंजना पंडित यांनी मुलांच्या उत्साहाला गप्पागोष्टी गाणी न्रुत्याद्वारे आनंदाचे भरते देत मार्गदर्शन केले. या सर्व स्वागताच्या कार्यक्रमाने विद्यार्थी आनंद होऊन गेले होते. 

यानिमित्ताने शाळेच्या व्यवस्थापनाकडून अध्यक्ष श्री . गोपाल जी धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना , उपाध्यक्ष राजेश झंवर, सचिव डॉ. शरद कोलते, सहसचिव बजरंग दरक तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
close