शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१
अहमदनगर शहरातील कांदा व्यापार्याचा विश्वासघात ; घातला लाखोंचा गंडा..!!
अहमदनगर : शहरातील कांदा व्यापार्याचा विश्वासघात आंध्रप्रदेशमधील तिघांनी केला आहे. या कांदा व्यापार्याला तब्बल 34 लाखचा गंडा घातला आहे.
नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 39 रा. सारसनगर) असे फसवणूक झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. याप्रकरणी बी. रामकृष्णा, पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजू (सर्व रा. गाजुवाका, जि. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सन 2019 मध्ये फिर्यादी चिपाडे यांची बी. रामकृष्णा, त्याचा कारभार पाहणारे पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजु यांच्याशी ओळख झाली. चिपाडे यांनी 18 जून 2020 रोजी ट्रकने 25 टन कांदा रामकृष्णा याला पाठविला.
चिपाडे यांना रामकृष्णा याने 25 टन कांद्याची रक्कम टप्प्याटप्याने पाठविली. यादरम्यान त्याने विश्वास संपादन केला. 22 जून 2020 ते 6 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यास 40 ट्रक कांदा प्रत्येकी 25 टन असा एकूण 10 लाख टन कांदा त्यास पाठविला.
या मालाची एकूण किंमत दोन कोटी सहा लाख 91 हजार 447 रूपये इतकी झालेली असताना त्याने टप्पाटप्प्याने एक कोटी 72 लाख 88 हजार 500 रूपये आरटीजीएस व बँक खात्यात जमा केले. उर्वरीत 34 लाख 2 हजार 947 रूपयांची रक्कम दिली नाही.
त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून तसेच त्याच्या गावी जावून सक्षम भेटलो असता त्याने रक्कम न देता फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.
कांदा व्यापार्याला गंडाविन्याचा हा पहिला प्रकार नाही. या अगोदर असे काही प्रकार घडलेले आहेत. या फसवाफसवीत व्यापारियों बरोबरच कांदा उत्पादकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

