शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०८ डिसेंबर २०२१
राहुरी : महिला संघटित व आर्थिक साक्षर झाल्यास गावचा विकास वेगाने होईल असे प्रतिपादन कनगरचे सरपंच श्री सर्जेराव घाडगे यांनी महिला बचत गटांच्या ग्रामसभेत केले.
राहुरी तालुक्यातील कनगर येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांना संघटित करून १७ बचत गटांची स्थापना करण्यात आली. उमेद अभियाना अंतर्गत तालुका व्यवस्थापक प्रवीण गायकवाड व प्रभाग समन्वयक अशोक खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली वर्धीनी ताई सुजाता मडवी, स्नेहल जाधव, प्रियांका विधाते, सुजाता लोहकरे यांनी वडीवस्तीवर जाऊन महिलांना भेटुन बचतीचे महत्त्व लक्षात आणून दिले व १५ व्या दिवशी ग्रामपंचायत समोर ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी बोलताना घाडगे यांनी महिलांचे स्वागत करून कनगर गावातील महिलांचे जास्तीत जास्त बचत गट स्थापन करून गावातील महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून छोटे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करेल. गावातील महिलांना संघटित करून बचत गट स्थापन करणेसाठी सौ. सुरेखा भांड यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच बाबासाहेब गाढे, नंदाताई घाडगे, ग्रामविकास अधिकारी पवार, ताराबाई गाढे, आरती गाढे, संगीता खाटेकर, यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

