shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवरा नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे लाखो माशांसह कुत्रेही मृत्युमुखी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१

प्रवरा नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे लाखो माशांसह कुत्रेही मृत्युमुखी..


राहुरी : राहुरी-श्रीरामपुर या दोन तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना वरदान ठरलेली प्रवरा नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने लाखो माशांसह कुत्रेही मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवरा नदी काठच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून कारखान्यातील घाण, मळी मिश्रीत पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले गेल्याने नदी पात्रातील पाणी काळ्याकुट्ट होऊन हे पाणी पिण्याच्या व वापरण्याच्या लायकीचे नसल्याने हे संपूर्ण दूषित पाण्याचा फटका राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, पाथरे महालगाव, दरडगाव, लाख, महाडूक सेंटर, शेनवाडगांव, कोपरे, तर श्रीरामपुर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक, भेर्डापुर, लाडगाव, केसापुर आदी दोन्ही तालुक्यातील गांवांना बसला आहे.

 

त्यामुळे नदी पात्रातील मासे मृत्युमुखी पडत आहेे. या माशांना कुत्र्यांनी खाल्ल्याने तेही मृत्युमुखी पडत आहेत तसेच उस तोंडनी कामगार, मच्छिमार व्यवसायिक, शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा खुडसरगांवचे माजी सरपंच आप्पासाहेब देठेे, शिवसेना संघटक भगिरथ पवार, पंकज आढाव, भाऊसाहेब गुरळे, सुनिल पवार, सुभाष देठे, भिमराज निशाणी, सुनिल शांतीलाल पवार, रंगनाथ पवार, मच्छिंद्र पवार, सचिन पवार, प्रसाद पवार, नंदू माळी, यादव बर्डे, वसंत गुंजाळ आदी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

"गेल्या काही दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात दूषित पाणी मुळे लाखो माशांसह कुत्रेही मृत्युमुखी पडत आहे. पुढील काळात मानवी जीवनाला धोका होउ शकतो याचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ बंदोबस्त पाटबंधारे विभागाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावा व प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल."
_ भगिरथ पवार, तालुका संघटक शिवसेना खुडसरगांव.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close