shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथे ना. भरणे यांच्या हस्ते श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.राज्यमंत्री भरणे यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधासाठी ८० लाखाचा निधी केला जाहीर.

वालचंदनगर येथे ना. भरणे यांच्या हस्ते श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतील  यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

राज्यमंत्री भरणे यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधासाठी ८० लाखाचा निधी केला जाहीर.
इंदापूर प्रतिनिधी :शनिवार दि. ४ डिसेंबर२०२१ रोजी वालचंदनगर येथील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी ऋचा मकरंद वाघ व पुणे विभागीय बोर्डात मुलींमध्ये प्रथम आलेली कुमारी उत्कर्षा योगेश शिंदे, कुमारी अनुष्का संजय गायकवाड या विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 याप्रसंगी नामदार दत्तात्रय भरणे यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा साठी ८० लाखांचा निधी मंजूर करत असल्याचे जाहीर करून तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. 
गुणगौरव सोहळ्यासाठी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक धीरज केसकर, शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार ,उपप्राचार्य अरुण निकम, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वालचंदनगर मधील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close