shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंगणवाडी सेविका पुनम निंबाळकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदानइंदापूर तालुक्यातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव.

अंगणवाडी सेविका पुनम निंबाळकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका  पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान

इंदापूर तालुक्यातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव


कुटुंबातील पती आणि सर्व सदस्यांच्या खंबीर साथीमुळे पुरस्कार मिळाल्याची  पूनम निंबाळकर यांनी  व्यक्त केले भावना

फोटो:  आदर्श अंगणवाडी सेविका  पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारताना अंगणवाडी सेविका पुनम निंबाळकर व पती घनश्याम  निंबाळकर व इतर 

इंदापूर  प्रतिनीधी:अंगणवाडी  स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्या कामाची दखल घेऊन सन २०२१ चा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करते वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे , महिला बालकल्याण सभापती पूजाताई  पारगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री शिवतारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरासे व इतर मान्यवर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   पूनम निंबाळकर माहिती देताना  म्हणाले की,  मी अंगणवाडीला दि.१७ नोव्हेंबर २००६ रोजी रूजू झाली. मी अंगणवाडीला रूजू झाल्यानंतर सन २००६ ते  २०१० पर्यंत माझी अंगणवाडी झाडाखाली भरत होती. इंदापूर तालुक्यातील मान्यवरांच्या सहकार्यातून २०१० ते २०११ साली मला जिल्हा परिषद च्या माध्यमातून अंगणवाडी बांधकाम मंजूर होऊन माझ्या कुटुंबाच्या सहकार्यातून बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले . सन २०१२ ते २०१३ साली लोकसहभागातून वर्गाची रंगरंगोटी करून आम्हाला जिल्हा परिषदने लाकडी टेबल व  खुर्चीचे वाटप केले. त्यातून एक नवीन प्रेरणा मिळली आणि पटावरील प्रत्येक लाभार्थ्यांला बसण्यासाठी लाकडी खुर्ची ( प्रती नग १४०० रु.)सुताराकडून बनवून घेतली.नंतर छोटे छोटे उपक्रम राबविले. पण २०१९ साली कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या कालावधीत प्रामाणिक कामाची जबाबदारी पार पाडली. 

कोविडच्या कालावधीत अंगणवाडी बंद असताना जे सामाजिक बांधिलकीतून जे कार्य केले त्याची नोंद घेऊन परमंथ जे मासिक मानधन वेळेवर दिले त्याचा परतावा किंवा कामाची जबाबदारी अशी पार पाडली की, केंद्राच्या निकषानुसार रिलायन्स पद्धतीने सेंद्रिय परसबाग करण्यात आली.गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पर्यवेक्षिका नसरीन तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर मधील  मान्यवरांच्या सहकार्यातून परसबागेच काम पूर्ण करण्यात आले. अशा अनेक सामाजिक कामाची दखल घेऊन आज  अंगणवाडी आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मला देण्यात आला आहे. याचा मला खूप मनापासून आनंद झाला आहे.


माझे पती कुटुंबातील सर्वांचे सहकार्य, मित्र मंडळींचे सहकार्य,इंदापूर तालक्यातील रणगांव , गुजरगोसावीवस्ती अंगणवाडी आणि गावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य त तसेच माझे आणि माझ्या पतीचे मुळगांव निरवांगी असून आम्ही कामानिमित्त वालचंदनगर येथे कायमचे राहत असून रणगांव , गुजर गोसावी वस्ती , वालचंदनगर ,निरवांगी ग्रामस्थांचे आशीर्वाद व  मोलाची साथ लाभली त्यामुळे हा पुरस्कार भेटला हा पुरस्कार मला भेटला नसून माझ्या गावालातील प्रत्येक नागरिकाला  व माझ्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेला भेटल्या सारखा आहे.  याचा मला सार्थ अभिमान आहे. यावेळी माझ्यासोबत
 पुरस्कारला उपस्थित बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ  पर्यवेक्षिका नसरीन तांबोळी व अंगणवाडी सेविका तनया जाधव उपस्थित होत्या.


close