शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा , एरंडोल, जिल्हा जळगाव दिनांक ०४ डिसेंबर२०२१
एरंडोल :-येथील जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्रात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पंचायत समिती कार्यालय अधीक्षक मिलिंद पवार यांच्या हस्ते डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच दिव्यांग बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कक्ष अधिकारी विजय चव्हाण, हातपंप विभाग प्रमुख दिलीप झोड, कक्ष परिचालक चंद्रराव सैंदाणे व कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ:- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपस्थित मिलिंद पवार,चंद्रराव सैंदाणे,व इतर अधिकारी

