shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"दापोडी, पुणे येथील सी.के .गोयाल महाविद्यालयात मतदान जागृती कार्यक्रम संपन्न"

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा:-
दापोडी :-संविधान जागृती सप्ताहांतर्गत नुकताच जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय दापोडी, पुणे- 12 येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत मतदान जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.लोकशाहीचा खरा आधारस्तंभ नागरिक असल्याने व नागरिकांना घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा महत्वाचा असल्याने मतदारांना जागृत करून त्यांच्याकडून योग्य लोकप्रतिनिधी निवडला जावा. या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
       

          कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सामूहिक संविधानाचे वाचन केले.

         या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. निशा मोरे यांचे"मतदानाचा अधिकार बजावताना"या विषयावर मार्गदर्शन झाले."याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या सुशासनासाठी जागृत पद्धतीने मतदान करूनप्रत्येकानेलोकशाही बळकटीस हातभर लावला पाहिजे".‌ प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी उपस्थितांना मतदान जागृती बाबत शपथ दिली.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी होते.कार्यक्रमाचे संयोजन: प्रा डॉ बाळासाहेब माशेरे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले.आभार: प्रा सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.
         कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहासष्ट(६६) विद्यार्थी उपस्थित होते.महाविद्यालयातील प्रमुख उपस्थितामध्ये प्रा. विदुला पुरंदरे, , प्रा. डॉ.शोभा शिंदे, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा ज्योती लेकुळे, दिपाली खर्डे, प्रा. प्रवीण गोरड, प्रा. विनोद डिके, प्रा. अमरदीप गुरमे,प्रा.वैभव वरडुले, हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीताने करण्यात आला.
close