शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१
कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांना ९० हजार ची बचतपत्रे देऊन वाढदिवस साजरा..!!
संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन करून वाढदिवस साजरे होत असताना स्वतःच्या वाढदिवसाला आंतराष्ट्रीय खेळाडू व कोरोना एकल पुनर्वसन समितीचे समन्वयक आप्पासाहेब ढूस (राहुरी) यांनी कोरोनात अनाथ झालेल्या ९ मुला मुलींना प्रत्येकी १०,००० रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र दिले व सामाजिक भावनेचे उदाहरण घालून दिले - हेरंब कुलकर्णी
देवळाली प्रवरा - दि. २७ डिसेंबर
आपत्ती नंतर सामाजिक कर्तव्य बजावने मह्त्वाचे असते आज संपत्तीचे प्रदर्शन करून वाढदिवस साजरे होत असताना देवळाली प्रवरा मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी आपल्या वाढदिवसाला कोरोनात अनाथ झालेल्या नऊ मुला-मुलींना ९० हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला.
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक तथा शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचा नऊ अनाथ मुलींना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत देऊन आगळ्या पध्दतीने जन्मदिन साजरा झाला.
वाढदिवसाला फ्लेक्स गुच्छ असा कोणताही बडेजाव न करता कोरोनात अनाथ झालेल्या वेगवेगळ्या गरीब कष्टकरी कुटुंबातील नऊ मुला-मुलींना त्यांनी निवडले. या ९ मुला मुलींना पोस्टात नेऊन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेऊन दिली व कार्यक्रमात वितरित केली. ती रक्कम या विद्यार्थ्यांना भावी शिक्षणाला उपयोगी पडणार आहे. यात निवडलेल्या कुटुंबात कर्ता पुरुष गेल्याने या महिला सध्या मजुरीचे काम करत आहेत व गरीब कुटुंबातील आहेत.
महाराष्ट्रात कोरोनात अनाथ झालेल्या कुटुंबांसाठी कोरोना पुनर्वसन समितीचे आप्पासाहेब ढूस हे राहुरी तालुका समन्वयक म्हणून काम करत आहेत. यापूर्वीही त्यांनी शासकीय कोरोना सेंटरला मदत करून अनेकांना जीवदान दिले आहे. नऊ महिन्याचे बाळ असलेल्या एका विधवा भगिणीच्या विवाह होण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. दिवाळी भाऊबीज त्यांनी देवळाली प्रवरा हद्दीतील बत्तीस महिलांना साडी आणि फराळ वाटप करून साजरी केली, हे सर्व दानशूर मंडळींमुळे मला शक्य झाले असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. आम्ही फक्त पोस्टमन ची भूमिका बजावतो असेही आप्पासाहेब म्हणाले.
या प्रसंगी हेरंब कुलकर्णी, तहसीलदार फसीयोद्दीन शेख, दत्ता कडू पाटील, सुरेंद्र थोरात, ललित चोरडिया, रफिक शेख, शिवाजी घाडगे, रामभाऊ काळे, आण्णासाहेब चोथे, विलास जाधव, विलास पाटील, विलासराव मुसमाडे, विष्णुपंत गीते, मंदाताई चव्हाण, राजनीताई कांबळे, नंदा ढुस आदी मान्यवरांनी आप्पासाहेब ढुस यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख, देवळाली हेल्प टिम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा म्हाडा चे अध्यक्ष ना. शिवाजी ढवळे, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे, साई आदर्श मल्टिस्टेट चे शिवाजी कपाळे, राहुरी अर्बन चे रामभाऊ काळे, आनंदऋषीजी पतसंस्थेचे ललीतसेठ चोरडिया, साई सेवा चे प्रदीप येवले, डॉक्टर केमिस्ट चे डॉ विलास पाटील, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा शिवाजीनगर व्यापारी असो चे अध्यक्ष विष्णुपंत गीते, शिवाजीनगर व्यापारी असो चे उपाध्यक्ष सुनील विस्वासराव, मराठा सेवा संघाचे विलास जाधव, विलास मुसमाडे, साइसेवा चे वाकचौरे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयेश माळी, वडार संघटनेचे गंगा गायकवाड, भिम आर्मी च्या मुन्ना चावरे, सोपान सौदागर, हेल्प टीम चे अमजद इनामदार, कुमार भिंगारे, ऋषिकेश संसारे, विजय कुमावत, प्रशांत कराळे, प्रिस्टाइन आयुर इंडिया चे डॉ सुरेश गर्जे, डॉ विष्णू जायभाय, मंदाताई चव्हाण, रजनीताई कांबळे, देवळाली सोसायटीच्या माजी संचालिका चांगुणाबाई ढुस, अरुण ढुस, प्रसाद ढुस, नंदा ढुस, वेणूनाथ शेटे, विठ्ठल शेटे, कदम ताई यांचे सह असंख्य मित्र, आप्तेष्ट व नागरिक उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

