अहमदनगर । प्रतिनिधी :-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथील सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्यानंतर गृहमंत्री अमित शहांचा ताफा साईमंदिरात दाखल झाला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी साईंचं मनोभावे दर्शन घेत पाद्यपूजा केलीये.
अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन पाटील, संस्थानचे विश्वस्त , सुरेश वाबळे, अॅड.सुहास आहेर , सचिन गुजर, जयवंतराव जाधव, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.

