प्रकाश मुंडे. | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
केज नगरपंचायत निवडणूकीची रणधुमाळी चालु झाली असुन एकुण सतरा प्रभागामध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालु झाली होती.परंतु ओबीसी आरक्षणाला न्यायालयाने स्थगीती दिल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.परंतु निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार ओबीसी प्रभागाची निवडणूक तुर्तास लांबणीवर पडल्याने एकुण तेरा प्रभागाचीच निवडणूक होणार आहे.
केज नगरपंचायत मध्ये एकुण सतरा प्रभाग असुन त्यापैकी प्रभाग क्रमांक १,२,८,१२ हे प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत होते.या प्रभागाची निवडणूक लांबणीवर पडली असुन एकुण तेरा प्रभागाची निवडणूक होणार आहे*.
तेरा प्रभागात एकुण ११९ अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक ३ मध्ये १०,प्रभाग ४ मध्ये ९,प्रभाग ५ मध्ये ४,प्रभाग ६ मध्ये ७,प्रभाग ७ मध्ये ८,प्रभाग ९ मध्ये ६,प्रभाग १० मध्ये १५,प्रभाग ११मध्ये १२,प्रभाग १३ मध्ये ७,प्रभाग १४ मध्ये ११,प्रभाग १५ मध्ये १०,प्रभाग १६ मध्ये १२,आणी प्रभाग १७ मध्ये ८ असे एकुण ११९ अर्ज दाखल झाले आहेत.तर ओबीसी आरक्षण असलेल्या प्रभाग १ मध्ये ८,प्रभाग २ मध्ये ४,प्रभाग ८ मध्ये १४,व प्रभाग १२ मध्ये ६ असे एकुण ३२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत .
केज नगरपंचायत निवडणूका मध्ये कांग्रेस , जनविकास आघाडी ( रमेश आडसकर, अंकुश इंगळे ) गट , राष्ट्रवादी काँग्रेस ( रणजितसिंह पाटील, शेकाप ) या तिन प्रमुख पॅनल तर शिवसेना, वंचीत बहुजन आघाडी, एम आय एम ,शिवसंग्राम या पक्षांनी पण केज नगरपंचायतीच्या निवडणूका मध्ये तोडीस तोड उमेदवार उभे करून रंगत वाढवलेली आहे.

