कर्मयोगी कारखान्याचे २ लाख ११ हजार मे. टन गाळप पूर्ण
- गळीत हंगाम प्रगतीपथावर
इंदापूर : प्रतिनिधी( दि.७ डिसेंबर २०२१)
महात्मा फुलेनगर (बिजवडी ता.इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२च्या गळीत हंगामामध्ये आज मंगळवारी (दि.७) अखेर २ लाख ११ हजार ६५० मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रगतीपथावर असून दररोज प्रतिदिनी सरासरी ८००० मे. टन गाळप क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा २ लाख मे. टनाचा पल्ला पार केलेबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी सर्व उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प सध्या पुर्ण क्षमतेने चालु आहेत. कारखान्याने चालू हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास प्रति टन रु. २५०० पेक्षा अधिकचा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रु. २१०० प्रमाणे नियमितपणे अदा केला जात आहे. चालू हंगामामध्ये कारखाना सुमारे १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट निश्चितपणे पुर्ण करेल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, शारदा पवार, कांचन कदम, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, कार्यकारी संचालक देवराव लोकरे व अधिकारी उपस्थित होते.

