शेळगांव केंद्रशाळेतील शिव वाघमारे व स्वप्नील ननवरे यांची ड्रिम्स अकॅडमी मार्फत मोफत क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड..!!
इंदापूर प्रतिनिधी:पंचायत समिती इंदापूर ,क्रीडा विभाग इंदापूर व सेवा भावी संस्था ड्रिम्स अकॅडमी ,सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इंदापूर क्रीडा संकुल येथे क्रीडा नैपूण्य चाचणी मध्ये शेळगांव केंद्रशाळेतील शिव वाघमारे याचा प्रथम क्रमांकाने व स्वप्नील ननवरे द्वितीय क्रमांकाने दोन विद्यार्थ्यांची ड्रिम्स अकॅडमी मार्फत घेण्यात येणार्या मोफत क्रीडा प्रशिक्षणासाडी निवड (दि.१७) रोजी करण्यात आली आहे. यानिमित्त या दोघांचा शालेय स्तरावर सन्मान केंद्रप्रमूख मारूती सूपूते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चावले यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव येथे करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक नामदेव गुंड सर ,संतोष वाघ सर,वंदना काकडे मॅडम व सविता मिसाळ मॅडम उपस्थित होते.
या कामी तालूका क्रीडा अधिकारी महेश चावले व सेवाभावी संस्थेचे ड्रिम्स अकॅडमीचे प्रविण कोकाटे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.


