shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

४३ कोटी रूपयांची पाईपलाईन पहिल्याच ट्रायल मध्ये नापास- सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा आरोप..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
कोपरगाव :कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात ४३ कोटी रूपयातील नवीन पाईपलाईन ची ट्रायल घेतली... 
आणि अजब प्रकार पहायला मिळाला...!


पाईपलाईन कोपरगाव मर्चंट सारखी रस्ते फोडून वरती येऊ लागली... जागोजागी पाण्याचे फवारे उडू लागलेत... रस्त्यात ठिकठिकाणी उफळ लागलेत... रस्ते खातेदारा सारखे डूबलेत.. खरच नवीन पाईपलाईन झाली का?.. हा नागरीकांना पडलेला प्रश्न ...!

जर नमनालाच घडाभर तेल लागले आहे तर शहरातील सगळी पाईपलाईन तपासली तर काय होणार .. दैत्य गुरूच जाणो..

मी १५/१२/२०२१ रोजी सकाळी  १०.३० ते १.३० नगरपरिषद समोर ढोल वाजवला.. कोपरगाव नगरपरिषदच्या दप्तरात कोणते पाईप, किती पाईप कुठे टाकले , कसे टाकले याची नोंदच नाही..मुख्याधिकारी यांनी ठेकेदारा कडून रेकॉर्ड मागवले आहे.. आता खरच रेकॉर्ड बनवून मिळणार! पाईप चे अकाऊंट खरच लागणार का?

त्याच पाईप लाईन ची ट्रायल सुरू झाली आणि ठेकेदार नगरसेवक यांचे पितळ मर्चंट सारखी रस्त्या खालून वर येऊ लागले.. मी तर २०१६ पासून भ्रष्टाचार होत असल्याचे ओरडत होतो..

आता प्रत्यय आला कि माजी नगरसेवक वअधिकारी यांनी आजवर नवीन पाईपलाईन ची ट्रायल का घेतली नाही.. भ्रष्टाचाराच्या शोधासाठी आजी व माजी लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का? कारण पाईपलाईन टाकली तेव्हा सहमती एक्सप्रेस धावत होती..

पैसे करोडो आणता.. पण गुणवत्तेत काम नाही.. नेते निकृष्ट गुणवत्ता पाहून शांत बसतात .. जनता भरडली जाते .. निवडणूका आल्या की कलगी तूरा सुरू होतो.. सगळ्यांनाच आवाहन आहे.. कोपरगावच्या जनतेला पाण्या पासून वंचित ठेऊन ४३ कोटी हडप करणाऱ्यांना शासन करा..!

संजय भास्करराव काळे
सामाजिक कार्यकर्ते
close