प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधि :-
कोरोना महामारीची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असताना ओमिक्राॕम विषाणुने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता कंबर कसली असुन केजचे तहसिलदार श्री दुलाजी मेंढके,नायब तहसीलदार श्री सचीन देशपांडे यांच्या सह नगर पंचायत केजचे कर्मचारी यांनी जनजागरण मोहीम हाती घेतली असुन व्यापारी व ग्राहकांना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत काय ? याची विचारणा केली तसेच लसीकरण प्रमाणपञ दुकानाच्या दर्शनी भागावर लाउन मास्क वापरण्याची सक्त ताकीद दिली.
तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले. दुकानात प्रवेश करताना ज्यांना मास्क नाही त्यांना प्रवेश देऊ नये.
तसेच सर्व व्यापारी बांधवांनी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे अन्यथा आपल्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा ईशारा तहसीलदार श्री.दुलाजी मेंढके यांनी दिला आहे.
मागील कोरोनाच्या काळात केज प्रशासनाने अतिशय उल्लेखनीय कार्य केले होते. परंतु नंतर शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यात पसरल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता.
अशा प्रकारची वेळ पुन्हा येऊ नये म्हणुन तहसील प्रशासन पुन्हा सज्ज झाले असुन मा.जिल्हाधिकारी बीड यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे अन्यथा दंडात्मक कारवाई ला सामोरे जावे लागेल असा ईशारा त्यांनी दिला आहे.

