प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करून केजकडे येत असलेले वाळूचे ट्रॅक्टर केज पोलिसांनी शनिवारी रात्री पकडले आहे.सदर ट्रॅक्टरमधील वाळूचे मोजमाप करून महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की,कळंब रस्त्यावरून वाळूचे ट्रॅक्टर हे केज शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शंकर वाघमोडे यांना मिळाली होती. त्यावरून शनिवारी रात्री सपोनि शंकर वाघमोडे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक मतीन शेख कळंब रस्त्यावर सापळा लावून केज शहराकडे येत असलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची तपासणी केली असता ट्रॉली ही वाळू भरलेली आढळून आल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर हे पोलीस ठाण्यात आणून लावले आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे नदीतून चोरून वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान,संबंधित वाळूच्या ट्रॅक्टरची माहिती सोमवारी तहसील कार्यालयास कळविण्यात येणार आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून सदर ट्रॅक्टरमधील वाळूचे मोजमाप करून ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.माञ सदर धडाकेबाज धाडीमुळे अवैध्य वाळु वहातुक करणाऱ्या वाळुमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

