shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरातील आजी-माजी मंत्र्यांनी घेतला अनिल पवार यांच्या बरोबर १५ मिनीटाच्या फरकाने पकाचा चहाचा आस्वाद.

इंदापुरातील आजी-माजी मंत्र्यांनी घेतला अनिल पवार यांच्या बरोबर १५ मिनीटाच्या फरकाने पकाचा चहाचा आस्वाद.


इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार नेहमीप्रमाणे पका च्या चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी (दि.५) रोजी आले असता त्याठिकाणी पत्रकार यांच्या बरोबर गप्पा मारत असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणावरून जात असताना हर्षवर्धन पाटील यांना अनिल पवार आणि पत्रकारांना पाहून चहाचा आस्वाद घेण्याचा मोह आवरू शकले नाहीत. ते पकाचा चहाच्या टपरीवर बसून हसत गप्पा मारत अनिल पवार यांना मिस्कील पणाने गप्पा मारत चहाचा आस्वाद घेतला. आणि उपस्थित सर्व सामान्यांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करून अनिल पवार यांच्याबरोबर गप्पा मारत निघून गेले.

परंतु पाटील गेले आणि गप्पा मारत असताना चक्क राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा अनिल पवार आणि पत्रकार यांना पाहताच पकाच्या चहाचा आस्वाद अनिल पवार यांच्याबरोबर घेतला. त्यांनीही उपस्थितांना बरोबर  आनंद घेत चहा घेऊन अनिल पवार यांना गप्पा मारत निघून गेले.

 पंधरा मिनिटांच्या फरकात अनिल पवार यांच्याबरोबर आजी-माजी मंत्री पकाचा चहा घेतात यावरून अनिल पवार यांच्या सामाजिक कार्याची सर्वसामान्य जनतेबरोबर आजी-माजी मंत्र्यांच्या मनात ही त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला आजच्या प्रसंगातून दिसून आला.

अनिल पवार हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत रात्र आणि दिवस नेहमी उपलब्ध असतात आणि त्यांच्या अडीअडचणीत सहभाग नोंदवतात त्यांचा नुकताच झालेला वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय मान्यवर तसेच युवक व महिला यांनी विक्रमी रक्तदान करून त्यांच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या अशा या कार्यकर्तृत्वान अनिल पवार यांच्या बरोबर आज चक्क हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांनी पंधरा मिनिटाच्या फरकाने पकाच्या चहाचा आस्वाद घेतल्याने अनिल पवार यांच्या कार्याची आणि आजी-माजी मंत्र्यांनी सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून चहा घेतल्याने सर्वसामान्य मधील आपुलकीचं नातं आज इंदापूर कराना पाहावयास मिळाले.
close