केज येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक श्री गणेश धपाटे सरांच्या सेवेचा रौप्यमहोत्सव उत्साहपुर्ण वातावरणात साजरा!!
प्रकाश मुंडे. | बिड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील छञपती शिवाजी शिक्षण संस्था , आडस संचलित वसंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक श्री गणेश भिमराव धपाटे यांच्या सेवेला नुकतेच पंचेवीस वर्षे यशस्वीपणे पुर्ण केल्या बद्दल महाविद्यालयातील कर्मचारी व कुटुंबातील सदस्यांनी ह्दयपुर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. पंचविस वर्षापुर्वी कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेबांनी त्यांच्या संस्थेत प्रा.धपाटे यांना सेवेची सुवर्ण संधी दिली होती. हिंदी विषयाचे अध्यापन करुन अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे.
आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात गेली पंचेवीस वर्षापासुन ज्ञानदानाचे कार्य प्रा.श्री गणेश धपाटे सर यशस्वीपणे करीत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात सर्व शैक्षणिक संकुल बंद असतानाही आॕनलाईनच्या माध्यमातून अद्यापनाचे कार्य चालुच होते.आता कोरोनाचा धोका थोड्या प्रमाणात कमी झाला असल्याने शाळा महाविद्यालये पन्नास टक्के उपस्थीतीत सुरुळीतपणे चालु आहेत .
यातुन वेळ काढुन आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना व मिञपरीवार,आप्तेष्टांना रौप्य महोत्सवाच्या निमीत्ताने एकत्र आणले.यावेळी सर्वांनी एकत्र येउन केक कापुन प्रा.गणेश धपाटे सरांचा सपत्नीक सत्कार करुन भावी आयुष्य व सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.हा कार्यक्रम आपल्या परिवारातील सर्वांसाठी आनंदाची पर्वणी होती.आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आपण भारावलो असुन आपल्या सहकार्यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी महाविद्यालयातील सहकारी,मिञपरीवार, नातेवाईक व परिवारातील तसेच सामाजिक ,साहित्यिक व सांकृतिक क्षेञातील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

