प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
इंदापूर: दि. ४/ कालठण नं. १ येथील ग्रामपंचायतीचा पूर्णपणे भोंगळ कारभार चालू असून, नसणारे सांडपाणी गटारीत सोडतो म्हणून गोविंद पाडुळे यांना बजावली नियमबाह्य नोटीस. कालठण ग्रामपंचायतीचा प्रचंड प्रमाणात घोटाळा चालू असून ग्रामपंचायतीने केलेला भ्रष्टाचार माहिती अधिकार मध्ये उघडकीस आणल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली जाधव व ग्रामसेवक हनुमंत पाटील यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते गोविंद पाडुळे यांना नियमबाह्य नोटीस बजावली. नागरिकांनी सांडपाणी गटारी मध्ये सोडायचे नाही तर मग कुठे सोडायचे असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतीने बंदिस्त गटार योजना शोभेसाठी केलेली आहे काय असे गोविंद पाडुळे यांनी विचारले. याविषयी ग्रामसेवकाला फोन केला असता अनेक नागरिकांना अशी नोटीस बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी गटारी मध्ये सांडपाणी सोडू नये अशी नोटीस तुम्ही जर बजावली असेल तर बंदिस्त गटार योजनेची बिलं घशात घालण्यासाठी काढली काय असा प्रश्न गोविंद पाडुळे यांनी उपस्थित केला.
ग्रामपंचायतीने बंदिस्त गटार योजना अर्धवट करून पैसे काढून घेण्याची गडबड केलेली आहे व पदाचा दुरुपयोग करून शोषखड्डा करून वसंतराव जावळे यांच्या शेतामध्ये गटारीचे पाणी सोडून दिले आहे. त्यामुळे शेतीला नुकसान होत आहे असा जावळे यांनी ग्रामपंचायतीला तक्रार अर्ज दिला होता तसेच सांडपाण्याच्या त्रासामुळे रविंद्र पाडुळे यांनी आजारी पडत असल्यामुळे त्यांनी देखील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्या विषयीचा अर्ज ग्रामपंचायतीला केलेला होता.
सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम ग्रामपंचायतीचे आहे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायत अकार्यक्षम ठरल्यामुळे,माहिती अधिकार कार्यकर्ते गोविंद पाडुळे यांना मानसिक त्रास देण्यासाठी व सामाजिक बदनामी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला व आरोग्याला तुमच्यामुळे धोका होत असल्याचे खापर पाडुळे यांच्यावर फोडण्याचा ग्रामपंचायतीने केविलवाणा प्रयत्न केला आहे याविषयी लवकरच वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे गोविंद पाडुळे यांनी शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले.

