shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अपघात ग्रस्तांच्या मदतीला गेले धावून. जखमींना ताफ्यातील पोलीस व्हॅन मध्ये घालून त्यांना उपचार कामी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात केले दाखल .बारामती – इंदापूर मार्गावर वेताळ पाटी या ठिकाणी झाला होता दुचाकी व टेंम्पोचा अपघातात .

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  अपघात ग्रस्तांच्या मदतीला       गेले धावून. जखमींना ताफ्यातील पोलीस व्हॅन मध्ये  घालून त्यांना उपचार कामी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात केले दाखल .

बारामती – इंदापूर मार्गावर वेताळ पाटी या ठिकाणी झाला होता दुचाकी व टेंम्पोचा अपघातात .


इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे  शनिवारी दि.०४ डिसेंबर रोजी रात्री पहायला मिळालेे.   यावेळी त्यांच्यातील व उपस्थिथित सर्वांचे माणूसपणाचं दर्शन दिसून आलेे. इंदापूर बारामती रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या इसमांच्या मदतीला तात्काळ धावून जात त्यांनी स्वतः अपघातातील जखमींना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल केले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवारी इंदापूर शहरात एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यावेळी रात्री दहा वाजता
इंदापूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारामती – इंदापूर मार्गावर वेताळ पाटी या ठिकाणी दुचाकी व टेंम्पोचा अपघातात झाला होता.या अपघातात शहरातील सरस्वतीनगर येथील दुचाकी चालक बाळू गोसावी व टेंभुर्णी येथील टेम्पो चालक दत्ता मासोळे हे जखमी झाले होते. राज्यमंत्री भरणे यांनी वेळ जाणत माणुसकी दाखवत तात्काळ आपला ताफा थांबवला. जखमींना ताफ्यातील पोलीस व्हॅन मध्ये  घालून त्यांना उपचार कामी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.


close