पुणे । प्रतिनिधी:
खेड सेझ बाधित शेतकऱी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ७/१२/२०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता "पत्रकार भवन" पुणे. येथे 'पत्रकार परिषद' घेण्यात आली.
खेड सेझ प्रकल्पाची सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांच्यावर आदिवासी/ दलित शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास संदर्भात ॲट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करणे. संदर्भात घेण्यात येणाऱ्या गुरुवार गुरुवार दिनांक ९/१२/२०२१ रोजी रोजी सकाळी ठीक अकरा वाजता(११:०० वाजता) "विभागीय आयुक्तकार्यालय" पुणे. येथे होणारे जाहीर धरणे आंदोलन याबाबत ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
सदर पत्रकार परिषदेमध्ये उद्योजक बाबा कल्याणी यांच्यावर फसवणुकीचे आणि ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल व्हावेत.मुख्यमंत्र्यांबरोबर पंधरा(१५%) टक्के परतावा प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठक आयोजित व्हावी. याबाबत सविस्तर खुलासा पत्रकारांना शेतकरी बांधवांनी केला.
या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव, मा. श्री.हरेश देखणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष मा. संगीताताई आठवले यांनी.
विभागीय आयुक्त कार्यालया समोर होणाऱे आंदोलन करूनही जर दखल घेतली गेली नाही. ठोस आश्वासन मिळाले नाही.तर मुंबई येथे मंत्रालयात घुसून केव्हाही आणि कधीही आठ(८ दिवसांच्या आत) दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेसाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, श्री.विश्वास कदम, श्री.दादाभाऊ जैद,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने श्री. हरेश देखणे (प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य) मा.संगीताताई आठवले (पश्चिम महाराष्ट्र, महिला आघाडी अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मा. राणीताई बेलके (पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मा. Ad.अरुण सोनवणे (रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड सचिव, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेसाठी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

