shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर : चोरट्यांनी एटीएम फोडले, परिसरात खळबळ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१ 

अहमदनगर : चोरट्यांनी एटीएम फोडले, परिसरात खळबळ..!!

राहाता : तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे नगर मनमाड रोडच्या कडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असुन त्यातुन 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे.
पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला व वर्दळीच्या ठीकाणी असलेले हे खाजगी कंपनीचे एटीएम चोरटयांनी गॅस कटरच्या साहयाने फोडले आहे. चोरटयांनी फिल्मी स्टाईलने सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर कलरचा स्प्रे मारला तसेच रेकॉडींग केलेली हॉर्ड डीस्कही घेवुन पोबरा केला.तसेच एटीएम मधील 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. गावात प्रथमच भर चौकात पडलेल्या दरोडयामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटना स्थळाला तातडीने भेट देवुन याबाबत अधिक तपास चालु केला आहे

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close