शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
अहमदनगर ते आष्टी धावली रेल्वे..!!
बीड/अहमदनगर : बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर- बीड- परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहेकरी नदीवरील पुलाचे काम नुकतेच पूर्ण आहे. त्यानंतर काल अहमदनगर ते कडा या स्थानकांदरम्यान एक रेल्वे धावली आहे.
नगर- बीड- परळी हा रेल्वेमार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किमी रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, निधीच्या अभावी प्रकल्प कित्येक वर्षे रखडला होता. आता 27 वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.
मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोह आणि नागायण डोह ते सोलापूरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किमी अंतराची चाचणी 17 तारखेला घेण्यात येणार आहे. दरम्यान अहमदनगर ते कड्यापर्यंत रेल्वे धावल्याने बिडकरांच्या आशा पल्लवित झाले आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

