शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ॲड. बोरूडे यांना जाहीर..!!
नेवासा (सोनई) : सरपंच सेवा संघाच्या वतीने " मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा " राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी सोनई ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य ॲड. राजाभाऊ बोरुडे यांची निवड झाली आहे.
ॲड. राजाभाऊ बोरुडे यांनी अहमदनगर कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, नेवासा भाजपा तालुका उपाध्यक्ष व जाणता राजा ग्रुप सोनईचे अध्यक्ष पदाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, सामाजिक कामे केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.
सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. यावर्षी २०२१ चा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार सोनई ग्रामपंचायतचे सरपंच ॲड. बोरुडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
हा सन्मान सोहळा दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर येथील माऊली संकुलन सभागृहात सकाळी १२ वा. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

