shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन फाउंडेशन तर्फे मोफत लसीकरण शिबीर संपन्न - राकेश नखाते

पुणे:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत त्याचप्रमाणे मातोश्री हॉस्पिटल च्या सहकार्यातून २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते ४:३० वाजेपर्यंत मोफत कोविडशिल पहिला व दुसरा डोसचे  मोफत लसीकरण शिबीर आयोजन करण्यात आली होते , शिवराज नगर, रहाटणी याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी परिसरातील नागरिकांनी या लसीकरणाचा  मोठ्या संख्येने लाभ घेतला असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन शाखा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राकेशभाऊ नखाते यांनी केले .

 ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला.या वेळी बोलताना म्हणाले कोरोणा, ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि ओमायक्रोन विषाणु वाढता प्रसार त्याच्यामुळे नागरिकांच्या हिताकरिता कोविडशिल लस दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे याकरिता या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागीय डॉ. प्रफुल्ल तपशालकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.बाळासाहेब कोळपे, पै.संतोष  चांदेरे त्याचप्रमाणे दत्तात्रय शेंडगे आणि हरीभाऊ नखाते, हरेश आबा नखाते, सतीश भाऊ सोनवणे संजय गोडंबे, प्रसाद नखाते, प्रमोद नखाते, नवनाथ माने ई. मान्यवर यांच्यासमवेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
close