shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टर प्रवीण निचत ह्यांना आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले ह्यांना राजाराम मोहन रॉय रत्न पुरस्कार व इतरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर..!


प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी    
बदलापूर :- बदलापूर येथील प्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या कार्याची दाखल घेत जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  हा पुरस्कार सोहळा येत्या २६ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येते संपन्न हणार आहे. ह्या सोहळ्यात डॉक्टर प्रवीण निश्चत ह्यांना ह्या वर्षीचा आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

        डाॅ.प्रवीण निचत

सौ.सुरेखा तुकाराम भोसले

       ॲड.जया उभे

आप्पासाहेब गणपती जाधव

    अभिनेत्री सौ.पुष्पा चौधरी, पुणे

समाजसेविका कामाक्षी सोनी

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले (महाराषट्र प्रदेश अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती )  हे आदिवासी व दुर्गम भागातील व्यक्ती असून समाजासाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती म्हणूंन लौकिक असणाऱ्या व्यक्तीला जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने राजाराम मोहनरोव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तसेच सौ सुरेख तुकाराम भोसले (पुणे) समाज सेविका  (महाराष्ट्र महिला बचत गट सदस्य), अडव्होकेट जया उभे पुणे,आप्पासाहेब गणपती जाधव शिक्षक सांगली जिल्हा, कामाक्षी सोनी समाज सेविका वाशीम जिल्हा, अभिनेत्री गायिका सौ पुष्पा चौधरी(पुणे) ह्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अश्या विविध ठिकाणच्या अद्भुत व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
close