शिंगवे । प्रतिनिधी :-
सविस्तर माहिती अशी की, सालाबाद प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव व दत्त जयंती शिंगवे नाईक येथील दत्तमंदिरात अतिशय उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
त्यावेळी मंदिरात अतिशय आकर्षक फुलांची सजावट केली होती.दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन जाधव प्रभाकर आणि तुपे विलास त्यांनी केले होते.महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर अतिशय छान संगीतमय मधुर भजनाचा कार्यक्रम पार पडला.

